सुख,समाधान,आनंदाची इच्छा तुम्हा आम्हा सर्वांची. अर्थात ही इच्छा असावीच.कारण हे जीवन सुंदर आहे. मात्र त्याकरीता व्यवहारीक नियोजन महत्वाचे. शेगांवचे श्री गजानन म्हणत, वेळ गेल्यावर कूप खणणे निरर्थक. कूप म्हणजे विहिर. तहान लागल्यावर विहिर खणण्यात काय तो शहाणपणा. अगोदरच नियोजन असावे. संसार करताना सुद्धा विचारपूर्वक करावा. अन्यथा जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपुन गेल्यावरी धन सहज होते न्याय हा.अशावेळी कोण मदतीला येतो. कोणी नाही. लोक स्वार्थाकरता जवळ करतात तसेच जवळ येतात. स्वार्थ झाला की जव...
Read More
Author: saching
परिचय गजाननाचा – भाग ३६
नैनं छिन्दन्ति शस्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारूतः
भगवद्गीतेतला हा श्र्लोक. आत्म्याची माहिती देणारा.शस्राने आत्मा मरत नाही. अग्नि जाळू शकत नाही. पाण्यात भिजत नाही की वारा वाहून नेऊ शकत नाही. शेगांवच्या श्री स्वामी गजाननानं जळत्या पलंगावर बसून गीतेतलं वर्णन सिद्ध करून दाखवलं. शब्दपांडीत्य परंतू अनुभव शुन्य ब्रह्मगिरी गोसावी यांना वास्तवाचे भान आणून दिले. नैनं छिन्दन्ति श्र्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता कां मानिता दर ह्या पलंगी बसण्याचा.? ज्यांनी राख लावावी त्यांनी उ...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३५
संतांनी मनूष्यावर कृपा केलेली अनेक उदाहरणे पोथ्या,पुराणे,ग्रंथांतून वाचायला मिळतात. शेगांवच्या गजानन बाबांनी प्राणिमात्रावरही कृपा केली. गोविंदबुवा टाकळीकर यांचा घोडा शांत केला. तेंव्हा त्यांनी उच्चारलेल्या गणी गण गणांत बोते या मंत्राचा त्याच्या मनःपटलावर परिणाम होऊन व्दाडवृत्ती नाहिशी झाली. सुखलाल यांची गाय शेगांवात आली. तशी ही शांत झाली. तिचे साखळदंड स्वतःच्या हाताने श्रींनी काढले. तिला कायमची आपल्या सेवेत ठेवून घेतले. मठ स्थापनेवेळी बैलगाडीत बसलेले महाराजांना इच्छित स्थळी विनावाहक बैलांनी पोह...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३४
अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये.प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. शेगांवीच्या श्री गजानन स्वामींनी बंडूतात्या दंडे यांना केलेला हा उपदेश. बंडूतात्या सात्विक,सदाचारी वृत्तीचे ब्राह्मण होते. दानधर्म, पूजाअर्चा करण्यात त्यांना आनंद. मात्र प्रपंच करून परमार्थ साधायला हवा. आहे ते सारे देऊन कफल्लक होण्यात काय अर्थ आहे. साहजिकच कर्जबाजारी होणे. कर्ज फेडता न आल्याने भितीपोटी आयुष्य संपविण्याचा विचार करणे अय...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३३
निःस्पृहता किती असावी. हे संतांकडून शिकावे. रामदास स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईंबाबा, शेगांवीचे गजानन महाराज असे अनेक संत झाले. विरक्तीतून समाजहित जपणारे ते संत. त्यांना आवड ती खर्या भावभक्तीची. अकोल्याचे बच्चुलाल आगरवाल यांनी एकदा श्री गजाननाची मनोभावे सेवा केली. श्रींस वस्र अलंकार परिधान केले. आपल्या जवळ होते नव्हते ते सारं श्रींस अर्पण केलं. बच्चुलाल यांचा भाव शुद्ध होता. त्यांना राम मंदिर बांधायची इच्छा होती. स्वामींनी त्यांचा भाव ओळखला, जानकीजीवन तुझा हेतु पूर्ण करेल. असा आ...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३२
शेगांवचे गजानन महाराज. नरदेहधारी परमेश्वर तो. भक्तांच्या आर्त हाकेला धाऊन जाणारे संत. सद्भक्त भास्कर पाटील यांना कुत्रे चावले. त्या कुत्र्याचे विष अंगी भिनू नये. म्हणून कृपा केली. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर कूत्र्यांच्या विषापासून वाचण्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे. हेही सांगितले. श्रींच्यामुळे तेथे अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे. हे समजले. आजही ती वनस्पती तेथे असेल. संशोधक शोध घेतीलही. आपण असा विचार करूयात योग,भक्ती,वेदशास्रसंपन्न, विविध भाषा बोलणारे गजानन स्वामी विद्व...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३१
मन असता पवित्र सदासर्वकाळ वाचावे गुरुचरित्र. श्री गजानन विजय ग्रंथही मनापासून वाचावा, असाच प्रासादिक वाणीचा ग्रंथ आहे. मन आणि शरीराची शुचिर्भूतता प्रसन्नता देते. मात्र केवळ कर्मकांड करणे मनाची स्वच्छता नसणे. हे योग्य नव्हे. शेगांवला श्री गजानन बाबांच्या दर्शनाला आलेला एक कर्मठ ब्राह्मण. शरीर शुचिर्भूततेला महत्व देणारा. श्रीं च्या मठाबाहेरील रस्त्यात एक कुत्रे मरून पडलेले पाहून तो खिन्न झाला. संतापला थेट श्रींचे साधूपण जळो येथपर्यंत बोलला. श्रींनीच त्याच्या बुद्धिपटलावरील भ्रम नाहीसा केला. योगसाम...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३०
गुरूराया कृपाराशी नका उपेक्षूं लेकरासी ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. भाऊ कवंर यांनी आर्ततेने मारलेली ही हाक. त्यांच्या हाकेतली पोटतिडीक शेगांवच्या गजाननाने अंर्तमनाने ओळखली. कवरांच्या शिदोरीसाठी महाराज चार तास तसेच उपाशी बसून राहिले. भक्ताच्या भक्तीचा हा खरा विजय. पण भक्तही अनेक परीक्षा उत्तीर्ण असावा लागतो. कवर अगदी एकनिष्ठ होते. ते जेंव्हा शेगांवात पोहोचले. तेंव्हा, त्या भाऊस पाहून समर्थै केले हास्यवदन बरेच दिलेस आमंत्रण ही कां वेळ जेवणाची? तूझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहीलो नाही अजू...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २९
शेगांवचे श्री गजानन. सात्विक, विरक्त, निःस्वार्थ, तत्वनिष्ठ, समाज प्रबोधक उच्चकोटीचे संत. पवित्र भाव जपणार्यांना जवळ करणारे मात्र दांभिकतेवर कडक प्रहार करणारे संत. माळी विठोबा घाटोळ, लक्ष्मण घूडे यांना स्वामी गजाननाने त्यांची जागा दाखवून दिली. मात्र शुद्ध भक्तीभाव असलेल्यांना एवढे जवळ केले की, महाराज आणि ते खरेखरेच पवित्र भक्त एकरूप झाले. टिकाकारांमूळे पितांबर शिंपी यांना शेगांव सोडावे लागले. श्रींनीच तशी आज्ञा त्यांना केली. मात्र फार लांब जाऊ दिले नाही. जवळच कोंडोलीत पितांबर महाराजांनी वास्तव्य...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २८
माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. शेगांवच्या गजानन महाराजांची ही वाणी. इतक्या विरक्त वृत्तीचे महाराज. साहजिकच तितक्याच विरक्त वृत्तीचे त्यांचे परम भक्त होते. त्यांना फक्त गजानन ईश्वराशी एकरूप व्हायचे होते आणि तसे त्यांनी करवून दाखविलेही. म्हणून तर स्वामींचे खरे भक्त आजही सर्वार्थाने पुजनीय आहेत. पितांबर शिंपी यांना तर अंगावर नेसायला वस्र नव्हते. एकदा श्रीं नीच स्वतः चे वस्र त्यांना नेसायला दिले. परंतू टिकाखोरांनी त्याचेच भांडवल केले. पितांबराचा पावलो...
Read More