परिचय गजाननाचा – भाग १७

श्रीराम म्हणा की गजानन म्हणा, सततच्या नामस्मरणाने वाणीची शुद्धता प्राप्त होते. परंतू उच्चारांचा पूर्वाभ्यास केला नाहीतर मूखातून चूकीचे,अर्थहीन,अस्पष्ट शब्द प्रसूत होतात. शेगांवच्या गजानन महाराजांना हे कधीच मान्य नव्हते. स्वतःच्या कृतीतुन त्यांनी हे दाखवून दिले असल्याची श्री गजानन विजय ग्रंथात उदाहरणे सापडतात. भागवतातल्या कथेतील उत्तरार्ध असो की वेदांचा उच्चार असो. ते अस्सखलित भाषेत, स्पष्ट शब्दोच्चारात म्हणत असत. त्यांचीही प्रखर बुद्धिमत्ता,दैवी तेज आणि साधना पाहून त्यावेळच्या तैलंगी ब्राह्मणांन...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १६

नटणं,मुरडणं हा माणसाचा स्वभाव. त्यात वावगं असं काहीच नाही. पण बाह्य सोपस्कारापेक्षा अंतर्यामीचे सोपस्कारही आवश्यक आहेतकी. ते रूजायला पाहीजे नामस्मरणाची साथ. पुन्हा पुन्हा नामस्मरणाचाच उल्लेख येतो आणि येत राहील. नामस्मरण चिरकाल टिकणारं आहे. त्यातुनच आत्म्याची, सत्य असत्याची जाणिव निर्माण होते. अर्थात जे नामस्मरण करतात. त्यांस हे सांगणे न लगे. जे करित नाहीत बाह्य सोपस्काराला अवाजवी महत्व देतात.त्याच्यासाठी हा अल्पसा प्रयत्न होय. शेगांवच्या गजानन बाबांनी सद्भक्त बाळकृष्ण बुवांना रामदासस्वामींच्या र...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १५

ईश ध्यानेन चित्तशुद्धी अर्थात ध्यान,मनन,चिंतन, नामस्मरणातुन मनूष्याचे चित्त शुद्ध होणे होय. येथे केलेल्या कर्माची अपेक्षाही नसते. असते ती फक्त चित्त शुद्धिची आस. शेगांवच्या श्री गजानन बाबांनी वज्रभूषण पंडीत यांना केलेला उपदेश असा की, कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. मी करतो ते माझे कर्तव्य म्हटले तरी अहंकार उत्पन्न होतो. त्यापेक्षा फळाची अपेक्षा ठेवायची नाही. भक्तीवर विश्वास ठेवून नैमित्तिक उपासना सुरुच ठेवायची. परंतु उपासकानेहि मी करतो, माझ्यामुळ...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १४

प्रपंच आणि परमार्थ दोन्ही भिन्न गोष्टी. त्याचे अवलोक करायचे म्हटले. तर पोथ्या पुराणे वाचून होणे अशक्य. त्यासाठी हवे आहे नामस्मरणाचे सातत्य एकदा प्रयोग तर करून पहा. सातत्याने नाम घेतल्याने काय होते ते. वाणीचा गोडवा निर्माण होण्याचे नामस्मरण हेच उगमस्थान आहे. श्रीराम म्हणा की गजानन म्हणा. भगवंताचे नाम आवडीने घ्या. तरच साधता येईल, प्रपंच करता करता परमार्थ. चालता, बोलता,उठता, बसता, लिहीता, वाचता, कर्म करता करता सतत नामस्मरण करावे, असे रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय. शेगांवच...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १३

संताच्या सहवासात अनेक लोक येतात. हौसे,गौसे,नौसे,स्वार्थसाधू,प्रापंचिक हरतर्हेची माणसे ती. परंतू साधूत्वाची चाड म्हणजे जाणिव असणारे फारच थोडे. आपमतलबी माणसे तर फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात. आजही आपल्या अवतीभवती अशी माणसं पाहायला मिळतात. स्रि असो की पुरूष, मुलगा असो की मुलगी स्वतःच्या स्वार्था पलिकडे समोरच्याचे नुकसान होत आहे असे त्यांना जराही वाटत नाही. कृतघ्न वृत्ती प्रवृत्तीचीच माणसे ती. शेगांवच्या अवलिया गजाननाने अशांना म्हटलंय, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधूत्वाची चाड नसे. ऐसे न कोणी कर...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १२

विवेक, सद्विचारांनी ध्येय साध्यतेकडे वाटचाल करता येते. शेगांवचे श्री गजानन महाराज विवेकी सत्पुरुष. अविवेकांने वागणार्यांना त्यांनी कृतीतुन फटकारले. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक लोक एखाद्याच्या जवळ येतात. मग तो संत असो की महात्मा. आपल्या तव्यावरची पोळी भाजून घ्यायची आणि नंतर पाहायचे पण नाही. स्वार्थसाधू, अविवेकी प्रवृत्तीचीच ही माणसं. त्यांना सद्गुणांची ती काय किंमत. म्हणून तर स्वामी गजानन म्हणतात, ऐसे न कोणी करावें संतापासी राहून बरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. श्रींचा हा उपदेश तुम्हा आम्ह...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ११

संत, महात्म्ये या शब्दातच खरी ताकद आहे ती निःस्वार्थ वृत्तिच्या लक्षणांची. परंतू आजच्या काळात अज्ञानापोटी अनेकांनी या शब्दांचा पाहिजे तसा अर्थ लावलेला दिसतो. कोणी सोईनुसार उपासना करतात. तर कोणी प्रसिद्धिसाठी उपासनेचा बाजार मांडताना दिसतात. काहिंनी तर स्वतःला संत म्हणवून घेण्यात धन्यता मानलेलि दिसते. वास्तविक संत होणे ही काही सोपी गोष्ट नाही. समाजातील आस्तिक, नास्तिक, टवाळखोर, टिंगलखोर यांच्या कडून होणारा अपमान, अवहेलना, कुचेष्टा सहन करून सुद्धा त्या जड जीवांचे कल्याण चिंतितो. भले करतो तो संत. शे...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १०

पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक मनूष्याचे कर्म ठरलेले आहे.संचित, प्रारब्ध आणि क्रियमाणानुसार तो जिवन जगत असतो. चांगले, वाईट, बरे, कडू, गोड असे अनुभव तो घेत असतो. काही माणसे राजयोगी तर काही सर्व सामान्य पद्धतीचे आयुष्य जगतात. कोणी आस्तिक कोणी नास्तिक असतात. ज्यांचे पुर्व सुकृत उत्तम त्यांचा उद्धार करण्यासाठीच संत अवतार घेतात. पण केवळ कृतकर्म भोगायला आलेल्यांविषयी मात्र मौन बाळगतात. शेगांवीचे गजानन बाबांनी हेच तर केलं. सज्जनांचा उद्धार केला. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्यावर कृपा केली आणि स्व...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ९

आपला जन्म का आणि कशासाठी झाला आहे, याचा जेंव्हा मनूष्य बारकाईने विचार करतो. तेंव्हा काय करायचे आहे. याविषयीची त्याची ध्येय निश्चिती होते. पण हे घडणे बहुतांश वेळा दुर्मिळच. त्याचा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात येत असतो. वास्तविक मनूष्य जन्माचे सारर्थ होईल, असे मार्मिक विवेचन शेगांवी च्या स्वामी गजाननाने केले आहे. ते म्हणतात, प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. आपण प्रापंचिक सुखाची लालसा घेउन जन्माला आलोय. परंतु या स्थितीत आपण आपल्याला आयुष्यात काय साध्य करा...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ८

मनूष्याने शरीररुपी वस्र परीधान केलंय. या वस्रावर आपले सार्यांचेच मनापासून प्रेम असते. परंतू सत्पुरूषांचे तसे नाही. त्यांचे असित्व अगदी अणू रेणूतही. आपल्यासारख्या भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या पामरांना हे ते काय समजणार. शेगांवीच्या गजानन स्वामींनी हेच म्हटलंय, मनुष्य योनीत जन्म झालेल्यांनी तरी आपल्या जन्माचे प्रयोजन ओळखायला हवे. सृष्टीतील प्रत्येक जीवमात्राचे अस्तित्व जाणून घ्यायला हवे. तरच आपण कोण, आपले कार्य काय. आपल्याला काय करायला हवंय व काय नको. याचा अर्थ बोध होण्यास सुरुवात होईल. अर्थात ही ...
Read More