गुरूराया कृपाराशी नका उपेक्षूं लेकरासी ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. भाऊ कवंर यांनी आर्ततेने मारलेली ही हाक. त्यांच्या हाकेतली पोटतिडीक शेगांवच्या गजाननाने अंर्तमनाने ओळखली. कवरांच्या शिदोरीसाठी महाराज चार तास तसेच उपाशी बसून राहिले. भक्ताच्या भक्तीचा हा खरा विजय. पण भक्तही अनेक परीक्षा उत्तीर्ण असावा लागतो. कवर अगदी एकनिष्ठ होते. ते जेंव्हा शेगांवात पोहोचले. तेंव्हा, त्या भाऊस पाहून समर्थै केले हास्यवदन बरेच दिलेस आमंत्रण ही कां वेळ जेवणाची? तूझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहीलो नाही अजू...
Read More
परिचय गजाननाचा
<p>परिचय गजाननाचा</p>
परिचय गजाननाचा – भाग २९
शेगांवचे श्री गजानन. सात्विक, विरक्त, निःस्वार्थ, तत्वनिष्ठ, समाज प्रबोधक उच्चकोटीचे संत. पवित्र भाव जपणार्यांना जवळ करणारे मात्र दांभिकतेवर कडक प्रहार करणारे संत. माळी विठोबा घाटोळ, लक्ष्मण घूडे यांना स्वामी गजाननाने त्यांची जागा दाखवून दिली. मात्र शुद्ध भक्तीभाव असलेल्यांना एवढे जवळ केले की, महाराज आणि ते खरेखरेच पवित्र भक्त एकरूप झाले. टिकाकारांमूळे पितांबर शिंपी यांना शेगांव सोडावे लागले. श्रींनीच तशी आज्ञा त्यांना केली. मात्र फार लांब जाऊ दिले नाही. जवळच कोंडोलीत पितांबर महाराजांनी वास्तव्य...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २८
माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. शेगांवच्या गजानन महाराजांची ही वाणी. इतक्या विरक्त वृत्तीचे महाराज. साहजिकच तितक्याच विरक्त वृत्तीचे त्यांचे परम भक्त होते. त्यांना फक्त गजानन ईश्वराशी एकरूप व्हायचे होते आणि तसे त्यांनी करवून दाखविलेही. म्हणून तर स्वामींचे खरे भक्त आजही सर्वार्थाने पुजनीय आहेत. पितांबर शिंपी यांना तर अंगावर नेसायला वस्र नव्हते. एकदा श्रीं नीच स्वतः चे वस्र त्यांना नेसायला दिले. परंतू टिकाखोरांनी त्याचेच भांडवल केले. पितांबराचा पावलो...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २७
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनी गेली. शेगांवचे गजानन स्वामींनी बाळकृष्ण बुवा रामदासी यांच्याकरीता म्हटलेला श्लोक होय. बुवा समर्थ रामदास स्वामींचे भक्त होते. संपूर्ण आयुष्य एकनिष्ठतेने त्यांनी राम नाम जपत रामदास स्वामींची भक्ती केली. उतार वयात सज्जनगड ची पायीवारी होइना. अखेर रामदास स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि गजानन रूपातून आपले दर्शन बाळकृष्ण बुवांना घडविले. बुवांच्या अंतःकरणाची अतिशय तीव्र आणि सात्विक होती. म्हणून तर गजानन स्वामी त्यांच्यासाठी धावून गेले. शरीरे...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २६
शेगांवच्या श्री गजाननाच्या सेवेत रममाण व्हायचंय. असे अनेक जण म्हणताना कानावर येते. पण महाराजांकरीता एकत्र आले आणि स्वतःच्याच स्वभावाप्रमाणे वागू लागले तर. होतं असं अनेकदा महाराज महाराज म्हणायचं आणि आपल्याच म्हणण्याप्रमाणे वागायचे. मग काय होणार हो. संस्था टिकेल का? सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात ज्याचं काम त्याला करू द्यावं. ठरलेल्या कामात सार्यांनीच लक्ष घातले तर अनेकांची मने दुखवितात. हि समज येण्याकरिता सतत श्रींचे नामस्मरण असावे. पण सेवेचा अहंकार नसावा. श्रींचे निस्सिम भक्त बाळाभाऊ शेगांवात सातत...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २५
संत हे राष्ट्र षुरूषच. त्यांनी राष्ट्राच्या उन्नतीकरीता अनेकांना सन्मार्गाला लावले. विचार परिवर्तन करून सत्याची जाणिव करून दिली. कोणाच्या हातून कोणते कार्य घडेल या संबंधीचेही संकेत दिले. भगवद्गीतेतील कर्मयोगावर जन्माला आलेले गीता रहस्य हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण होय. शेगांवच्या श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि कृपाप्रसादाने हा ग्रंथ निर्मिला तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. श्रींनी दिलेली स्फुर्ती शारदेच्या स्वरूपातून प्रगटली. ब्रह्मदेवाची कन्या शारदा हीच शब्दरुप होऊन टिळकांवर प्रसन्न झ...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २४
संतांची सेवा करावी. पण फळाची अपेक्षा धरू नये. ते आपोआप मिळतेच. शेगांवच्या गजानन स्वामींचे परम शिष्य भास्कर पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण होय. याच पाटलांच्या शेतातील कोरड्या विहिरीला गजाननांनी पाणी आणलं. भास्कराच्या अंतःकरणात भक्तीचा मळा फुलविला. श्रींच्या सेवेत रममाण झालेल्या भास्कराचा अंतही श्रींच्या समोर झाला. पण त्यांना वैकुंठ प्राप्ती झाली. तत्पुर्वी श्रींचे आणखीन एक परम शिष्य पाटलांना म्हणाले होते, भास्करा तू धन्य धन्य संतसेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वानू तुझी. श्रींच्या स...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २३
महाराष्ट्र ही संतांची भूमी. अनेक संत महात्म्यांनी येथे त्यांचे कर्म निश्चित केले. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे वृक्ष नंदनवनीचे अन्य ठायी न येती हो. आपण सामान्य मनूष्य आहोत. आपल्याला आपला उद्धार करायचा असेल. तर सकारात्मक विचारांची जोड हवी. त्याकरीता संत विचारांचे वाचन,मनन, चिंतन असावे. तेच आपले चांगले कशात आहे, हे ओळखू शकतात. एक संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे. संत साक्षात् ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला ...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २२
तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. शेगांवच्या स्वामी गजाननाने वज्रभूषण पंडीत यांना केलेला हा उपदेश. लिलावतारी हा सत्पुरूष मूळातच निस्वार्थ वृत्तीचा. त्यांनी चमत्कार केले. ते काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धिसाठी नव्हे. तर समाजउपयोगी कार्यासाठीच. ईश्वर स्वरूप तो पुण्यात्मा. त्याच्या नामस्मरणाने सुद्धा आपली दुःखे, संकटे हरणार आहेत. मात्र त्याकरीता हवी दृढ इच्छाशक्ति आणि प्रबळ विश्वास. आजही श्रींचे अस्तित्व आहे. बेंबी देठापासुन त्यांना आर्त साद...
Read More
परिचय गजाननाचा – भाग २१
राजाचे जेथे वास्तव्य तिच त्याची राजधानी. शेगांवीचे बाबा गजानन जेथे जात तेथे भक्तिचा मळा फुललेला असे. म्हणून तर म्हटलंय, समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जया स्थला तिच होते राजधानी. महाराज आकोलीला भास्कर पाटलाच्या शेतात गेले. तेथल्या कोरड्या विहिराला त्यांनी पाणी आणलं. कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात गेल्यावर त्यांनी ब्रह्मगिरी गोसावी यांना मनूष्य जन्माचे मर्म सांगितले.अशी अनेक उदाहरणे श्री गजानन विजय ग्रंथात आहेत. आजमितीला श्रींचे लिलाकार्य जगभर पसरलेले आहे. जणूकाही अवघे विश्व ग...
Read More