भक्तांना आलेले अनुभव – डाॅ. डी. एन. ठवळी, (गाडगेनगर, अमरावती)

भक्तांना आलेले अनुभव डाॅ. डी. एन. ठवळी, (गाडगेनगर, अमरावती) नागपूरला हे बी. ए. एम. एस. च्या शेवटच्या परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यावेळी रामनवमीच्या उत्सवाला शेगावला जाण्याची त्यांना इच्छा झाली. पण तिथे जाण्याजोगी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्या वेळी ते अभ्यासाबरोबरच होमिओपॅथीची प्रॅक्टीस करत असत. एके दिवशी संध्याकाळी बॅग घेऊन ते बाहेर पडले. एवढ्यात गणेश नारायणराव मोहोरे यांनी त्यांना वाटेतच शंभर रुपये दिले, आणखीही दोन ठिकाणांहून त्यांना दोनशे दहा रुपये मिळाले. शेगावला जाण्याचा मनोमन विचार करुनच...
Read More

भक्तांना आलेले अनुभव – सौ. प्रतिभा मुकुंद देशपांडे, (मु. पो. पुसद, जि. यवतमाळ)

भक्तांना आलेले अनुभव सौ. प्रतिभा मुकुंद देशपांडे, (मु. पो. पुसद, जि. यवतमाळ) या कुटुंबाची गजानन महाराजांवर अपार श्रद्धा आहे. प्रतिभाताईंचे पती मुकुंदराव हे गुरुवारचा उपवास करतात. त्यांच्या आयुष्यात जो गंभीर प्रसंग घडला तो गुरुवारीच ! काही कामानिमित्त मुकुंदराव गाडी घेऊन विश्रामगृहाकडे चालले होते. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ होती. त्यांच्या घरापासून तिकडे जाताना एक वळण लागतं. ते वळण असं आहे की, समोरुन येणारी व्यक्ती दिसत नाही. त्याच वळणाच्या ठिकाणी त्यांच्या गाडीखाली एक तीन वर्षाचं मूल आलं. गाडील...
Read More

भक्तांना आलेले अनुभव – शंकरराव दामोदर घोटेकर, (२०६, तानाजी चौक, भसे वाडा, सिन्नर- ४२२१०३, जि. नाशिक.)

शंकरराव दामोदर घोटेकर, (२०६, तानाजी चौक, भसे वाडा, सिन्नर- ४२२१०३, जि. नाशिक.) शंकररावांचा सर्वात वडील मुलगा सव्वासात वर्षाचा आहे. त्याच्या जन्मापूर्वीच त्यांनी गजानन महाराजांना नवस केला आहे. नवस करताना ते म्हणाले होते, मला मुलगा होऊ दे, मी त्याला घेऊन दर्शनाला येईन.... परंतु काही अडचणींमुळे त्यांना दर्शनाला काही जाता आलं नाही. वयाच्या एक वर्षापासूनच त्यांच्या मुलाला ताप येऊ लागला. ताप जास्त झाला की, त्याला फीट यायची . त्याची स्थिती फार वाईट झाली. बरेच डाॅक्टरी इलाज झाले. तात्पुरतं बरं वाटायचं,...
Read More

भक्तांना आलेले अनुभव- अरुण हळबे,(टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ.)

भक्तांना आलेले अनुभव अरुण हळबे,(टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ.) अरुण हळबे हे यवतमाळ येथे एक मान्यवर शिक्षक म्हणून मशहूर आहेत. त्यांचे वडील अनंत परशुराम हळबे हे गजाननमहाराजांचे उपासक होते. १९६१ साली वयाच्या ६९ व्या वर्षी ते कालवश झाले. १९०७ साली वयाच्या पंधराव्या वर्षी विद्यार्थिदशेत असतानाच प्रथम ते शेगावला गेले. अगदी सकाळी स्नान उरकून ते त्यांच्या दोन मित्रांबरोबर महाराजांच्या मठात गेले. महाराज उठून बसलेले होते. अवतीभोवती भक्तगण होता महाराजांना चिलीम भरुन देणं, प्रसाद म्हणून पेढे-नारळ देणं सुरु होत...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव-सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.) 

भक्तांना आलेले अनुभव सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.)  सो सुलभाताई शेगावला बदलून येण्यापूर्वी त्या बाळापूरला सहशिक्षिका होत्या. बाळापूरला असताना त्यांचा देवधर्माकडे फारसा ओढा नसे. लहान-लहान मुलींनाघरात एकट्यांना ठेवून शाळेत जाताना त्यांना अतिशय वाईट वाटायचं, पण इलाजच नव्हता. कारण मुलांकडे बघणारं घरात कुणीच नव्हतं. एकदा त्यांना अशीच काळजी लागली असताना त्यांना स्वप्न पडलं. दारातून कुणीतरी नग्न पुरुष आत डोकावून पाहात होता. त्या भीतीनं ओरडल्या, वेडा आ...
Read More

भक्तांना आलेले अनुभव – चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.)

चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.) चंद्रशेखर वराडपांडे हे १९४८ च्या डिसेंबर महीन्यात वद्यातल्या एकादशीला शेगावच्या वारीला गेले. श्री गजानन-विजय या ग्रंथाचं पारायण आटोपलं. तिथेच महाराजांच्या देहविसर्जन स्थळाजवळ श्री पुंडलिकबाबा भोकरे बसले होते. देवस्थानात दाण्याच्या उसळीचा प्रसाद घेत असताना वराडपांडे यांना पुंडलिकबाबा म्हणाले, इथून जवळच नागझरी आहे. तिथे गोमाजीबुबा आहे. दर्शन घेऊन ये.... देवस्थानच्या उत्तरव्दाराजवळ काही मानसं बसलेली होती. त्यांनी हातांनी खुणा...
Read More

असे घडतात चमत्कार- भाग क्र. ३ व ४

जे चमत्कार घडतात ते सारे मन:सामर्थ्यावर अधिष्ठित असतात. मानवी मन हेच त्या चमत्कारांचं उपादानकारक आहे. याच सामर्थ्यावर *नराचा नारायण होतो* परंतु ज्या मनावर ही चमत्कारांची कलमं केली जातात ते मन आहे पार्‍यासारख. किंवा वार्‍यासारखं चंचल ! ते मन या क्षणी इथे तर दुसर्‍या क्षणी हजारो मैलाचा प्रवास करुन तिथ जातं. कधी सुखसागरी पोहतं तर कधी दु:खाच्या डोही डुंबत. या मनाचं शास्र शेकडो वर्षापुर्वी या अध्यात्मिक भूमीत निर्माण झालं.  पिंडी तेच ब्रह्यांडी या न्यायानं या सर्व मानवी मनांचा विश्वव्यापी मनाशी संबंध...
Read More

असे घडतात चमत्कार – भाग क्र. १ व २….

भाग क्र. १ व २.... असे घडतात चमत्कार...... या योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध विश्वात चमत्कार घडतात असंही म्हणता येणार नाही आणि घडत नाहीत असंही म्हणता येणार नाही. ज्या घटनेचा कार्यकारणभाव मानवी मनाला आकलन होत नाही ती घटना आपण चमत्कार या सदरात टाकून मोकळे होतो. परंतू ती घटना घडलीच नाही असं आपल्याला मानता येणार नाही. कारण ती व्यक्तावस्थेत समोर दिसत असते.... मनाला मोहून टाकणारे सूर्योदय आणि सूर्यास्त, अमृताची बरसात करणारा शरदऋतूतला पौर्णिमेचा चंद्र, महत्वकांक्षी मनाला सतत साद घालणारी पण कधीही हाती न ...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ४९

शेगांवचे गजानन स्वामींचे लिलाचरित्रातून अनेकविध विषयांवर त्यांनी केलेले भाष्य अभ्यासण्या सारखे आहेच. मुखत्वे करून कृतीत आणण्यासारखे आहे. सकारात्मक मानसिकता, व्यावहारीक चातुर्य, प्रपंच परमार्थ, नितीमत्ता, योग अध्यात्म अशा अनेक विषयांची उकल होऊ लागते. ३६६८ ओव्यांच्या ग्रंथात प्रत्येक ओवी गर्भितार्थ दडलेला आहे तो जाणवतोही. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी साधुसंत येता घरी विन्मुख त्याला लावू नये. अपमान खर्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होतसे बापा साचा संतचरणी प्रेमा धरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ४८

कर्ममार्गात व्रत वैकल्य नैमित्तिक पूजा अर्चा शुचिर्भूतता सांगितली आहे. शेगांवच्या श्री गजानन महाराजांना भेटायला आलेले श्री वासूदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी हे कर्ममार्गी सत्पुरूष. तर स्वामी गजानन परमहंस संन्यासी. एक कर्माचा सागर एक योगयोगेश्वर एक मोगरा सुंदर एक तरू गुलाबाचा. कर्माचा मार्ग तसा कठीण. कारण काटेकोरपणे नियम पाळणे होय. योगमार्ग त्याहून कठीण. या मार्गात तर योग साधना जमली पाहिजे. मात्र भक्तीमार्ग त्याहून सोपा. फक्त श्रींचे नामस्मरण करणे होय. जळी,स्थळी, काष्टी,पाषाणी चराचरात नाम सामावल...
Read More