निखळ मैत्री, पवित्र नाते आणि सद्विचारांचा सन्मान करणारे शेगांवचे श्री गजानन महाराज खरे समाजसुधारक आणि प्रबोधनकार. बायजा आणि पुंडलिक भोकरे यांच्या पुर्वजन्मीचे नाते श्रींस माहिती होते. दोघा बहिण भावाचा त्यांनी सन्मानच केला. दोघांची अंतःकरणेही शुद्ध पवित्र होती. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोक निंदा जरी करिती तरी अंतर न द्यावे इजप्रती दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मींचे. शिव...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४६
चौर्यांशी कोटी योनीनंतर मनूष्य जन्म मिळतो. असे म्हणतात. आपल्या संचितावरून प्रारब्ध ठरते. प्रारब्धानूसार क्रियमाण ठरते. मात्र शेगांवचे श्री गजानन महाराज म्हणतात, जन्म मरण हिच मूळी भ्रांती आहे. आत्मा अमर आहे.आपण उगाचच शरीररूपी वस्त्राला किंमत देतो. आत्म्याला अंतरात्म्याची ओढ लागली तर ह्या सार्या मायाजालाची अनुभूती येऊ शकेल. अर्थात त्याकरता हवे ते नामस्मरणाचे सातत्य. जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणावयालागूनी परमार्थाचा उपाय जाणी शास्रकारे कथन केला. त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्धभोग भोगा...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४५
शेगांवीचे गजानन स्वामींचे त्याही काळी अनेक शिष्य होते. त्यामध्ये सर्व प्रकारची मंडळी होती. दत्तात्रय केदार, दुधाहारी बुवा, नारायण जामकर यांनी तर श्रींच्या चरणी सर्वस्व अर्पिले. मात्र त्यांना कधीही प्रसिद्धिचा हव्यास नव्हते. त्यांनाच काय ज्यांनी ज्यांनी श्री चरणी सर्वस्व अर्पिले. त्यांना कोणाला प्रसिद्धि नको होती. पण त्यांच्या निस्सिम भक्तीमुळे प्रसिद्धि त्यांच्या मागे धावून आली. दत्तात्रय केदार हे तर उच्चशिक्षित व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सरकारकारी नोकरी गाडी घोड्याचा त्याग केला आणि स्वामी गजानन ...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४४
मंदिर असो की मशीद दोन्हीची रचना निराळी. मात्र बांधकामाचे साहित्य एकच असते. मग भेदभाव कशाला. ईश्वर किंवा अल्ला ही त्या विधात्याची दोन वेगवेगळी नावे आहेत. भगवद्गीता, कुरआन मध्ये मानव जातीचे कल्याण म्हटले आहे. शेगांवच्या संत श्री गजानन महाराजांनी हेच तर सांगितले आहे. महेताबशा फकीर होते. तर महाराज परमहंस संन्यासी. दोघांचा अवतार मानव जातीच्या कल्याणासाठी. महाराजांच्या आज्ञेने महेताबशा पंजांबात निघून गेले. त्यावेळी गजानन स्वामींनी केलेला उपदेश आजही विचार करायला लावतो. ते म्हणाले, यवनजातीत जन्मून काही ...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४३
श्रींच्याकडे काही मागायचे म्हणले की आपण पामर माणसं लगेच तयार होतो. वस्तूतः काहीतरी मागण्यासाठीच आपली सेवा,उपासना असते. पड्रिपूंचे अस्तित्व असल्याने मागणे हा स्वभाव ओघाओघाने येणार, हे साहजिक. हो पण मानसिक समाधानासोबत भौतिक सुखाची लालसा आपल्याला जडली असल्याने, सुखाच्या कल्पनाही निराळ्या असतात. हेच बघाना हरी जाखडे या ब्राह्मणाने शेगांवीच्या गजानन स्वामीं च्या कडे काय मागितले. तर संसार सुख. तेंव्हा आश्चर्य चकीत झालेले गजानन बाबा एकदम म्हणाले, संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने येथे येउनिय...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४२
प्रत्येकाच्या भक्तीची, उपासनेची तर्हा निराळी असल्याचे नेहमी पाहायला मिळते. श्री गजानन स्वामींची आराधना हाच त्यामागचा उद्देश असतो. कोणी पायी वारी करतात. तर कोणी पारायणे, कोणी नामस्मरण करतात. मात्र या अवस्थेतही शेगांवाचे स्वामी गजानन आपल्या मदतीला धावून येतात. संकटकाळी रक्षण करतात. श्रींचे परम भक्त पुंडलिक भोकरे यांनी मुंडगांव ते शेगांव पायी वारी केली. मात्र त्यांना वारीतच शारिरीक व्याधी जडली. ते कसेबसे शेगांवला आले. तेंव्हा महाराजांनी पुंडलिकबुवांच्या व्याधीचं निवारण करून त्यांचे गंडांतर घालविले....
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४१
नर्मदा परिक्रमा करणारे अनेक आहेत. ही चांगली गोष्ट. शक्य त्यांनी जरूर करावी. शेगांवच्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला प्रत्यक्ष नर्मदा आली होती. भक्तांच्या आग्रहास्तव महाराज तेथे गेले होते. पण नौकेला छिद्र पडल्याने पाणी आत शिरत होते. परी महाराज निर्धास्त होते.' गिन गिन गणांत बोते' ऐसे भजन मुखाने चालले होते अखंड. घाबरलेल्या भक्तांना त्यांनी धीर दिला. त्यांनी नर्मदेची प्रार्थना केली, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मनी. नौकेतले पाणी निघून गेले. नर्मदा श्रीं ओं...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ४०
सध्याच्या जमान्यात अनेक स्वयंघोषित गुरू झालेले ऐकायला,पाहायला, वाचायला मिळते. त्यांच्यावर परीक्षा न विश्वास ठेवणारेही बहुसंख्य सापडतात. पण हिरा सुद्धा पारखून घेतात हो. शेगांवचे श्री गजानन महाराज असेच उच्चकोटीचे संत. त्यांचीही परीक्षा पाहीली. तेंव्हा कुठे त्यांना अनेकांनी गुरू केले आणि करत आहेत. त्यांच्यावर टिका करणार्यां भागाबाईने म्हटले होते, गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता. ही सर्व लक्षणे स्वामी गजाननाकडे होती आणि आजही आहेत. परंतू भागाबाई सारख्...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३९
एक संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे. आपले हित संतांना माहिती. एखाद्या संतावर टिका करण्यापेक्षा सत्य काय ते तपासून पहावे. शेगांवीचे श्री गजानन महाराज यांच्यावर अनेकांनी टिका केली. श्री गजानन विजय ग्रंथात त्याची उदाहरणे आढळतात. महाराजांच्या नावाखाली भक्त म्हणविणारे तेंव्हाही भांडले व आजही वादविवादाच्या फेर्यात काही जण अडकल्याचे दृष्टीस येते. विचारांचं परिवर्तन, आपल्यातील चूका, अमूक व्यक्ती पाहिजे तमूक नको अशा चूकीच्या कल्पनांपासून संतच आपल्याला परावृत्त करतील. का...
Read More
परिचय गजाननाचा – भाग ३८
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनि गेली. शेगांवच्या श्री गजाननांनी बाळकृष्णबुवा रामदासी यांना दर्शन देण्याकरीता उच्चारलेला हा श्र्लोक. श्रीं च्या आणि समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाने बाळकृष्णबुबांमधील संभ्रम नाहीसा झाला. सात्विकतेला सकारात्मक तेजाची जणू झळाळी मिळाली.अंगी निःस्वार्थता आणखीन विकसली. गजानन स्वामींनाच त्यांनी आपलं मानलं. पण तोच लक्ष्मण घूडे. त्याला स्वतःचा स्वार्थ आठवला म्हणून खजिन्याच्या उंबर्यावर जाऊन बसला. त्याच्यातला दूजाभाव पाहून महाराज त्याला म्हणाले,माझे माझ...
Read More